गुरुदेवांच्या वहीची किंमत फक्त ९१ लाख रुपये

न्यूयॉर्क नोबेल पुरस्काराने सन्मानित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक वही न्यूयॉर्कचे ऑकशन हाऊस सथबीज यांनी ९१ लाख ३७ हजार ६०६ रुपये लिलावात विकली. टागोर यांच्या १९२८ सालच्या वहीत काही कविता आणि इतर साहित्य कृतींचे लेखन आहे.

Updated: Dec 14, 2011, 04:35 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

न्यूयॉर्क नोबेल पुरस्काराने सन्मानित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक वही न्यूयॉर्कचे ऑकशन हाऊस सथबीज यांनी ९१ लाख ३७ हजार ६०६ रुपये लिलावात विकली. टागोर यांच्या १९२८ सालच्या वहीत काही कविता आणि इतर साहित्य कृतींचे लेखन आहे. यात १२ कविता आणि बंगाली भाषेतल्या १२ गीते आहेत. तसंच प्रकाशीत साहित्याचे संशोधनाचा मजकूरही त्यात आहे. टागोर यांची ही वही दीड ते अडीच लाख डॉलर पर्यंत विकली जाईल अशी अपेक्षा होती पण शेवटी १७०५०० च्या बोलीवर लीलाव पक्का झाला.

 

टागोर यांनी ही वही आपल्या जवळच्या मित्राला भेट दिली होती. या वहित नृत्यनाटिका चित्रागंदातल्या दोन गीतांचाही समावेशही आहे. या नृत्यनाटिकेचा पहिला प्रयोग १८९२ साली सादर झाला होता. पण त्यानंतर त्यात बदल करुन १९३६ मध्ये परत एकदा ही नृत्यानाटिकेचे प्रयोग करण्यात आले. टागोरांच्या १९३१ साली प्रकाशीत गीतोबिताना संग्रहातील तीन गीतांचा समावेशही या वहीत आहे.