www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईचा थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्राने सात टक्के महागाईच्या भत्त्यात वाढ केली आहे. आता हा भत्ता ६५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
देशभरातील जनता महागाईने होरपळत आहे. या महागाईवर फुंकर घालण्याचे काम केंद्र सरकारने केली आहे. शुक्रवारी सरकारने केंदीय कर्मचारी आणि पेन्शनधाराकांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ जाहीर झाली आहे. यामुळे सरकारवर साडेसात हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल. या वाढीचा लाभ ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
आधी मूळ वेतनावर असलेला ५८ टक्के महागाई भत्ता वाढवून आता ६५ टक्के करण्यात आला असून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ १ जानेवारी, २०१२ पासून लागू होईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये सात टक्क्याने वाढ करण्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरुन ६५ टक्के होणार आहे. महागाई भत्त्यामधील वाढ ही सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.