कन्नाडींचा धिंगाणा; ठाकरेंच्या प्रतिमेची विटंबना

बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. यावढ्यावर न थांबता त्यांना देशद्रोही ठरविण्याची मागणी केली.

Updated: Nov 29, 2011, 08:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, बेळगाव 

 

मराठी भाषिकांविरुद्ध गरळ ओकणाऱ्या चंद्रशेखर कंबार यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. यावढ्यावर न थांबता त्यांना देशद्रोही ठरविण्याची मागणी केली.

 

त्यानंतर या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बेळगावमधील प्रवीण शेट्टी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शेट्टींच्या हॉटेल्सवर हल्लाबोल केला.

 

बेळगाव कर्नाटकचेच आहे; पण महाराष्ट्र एकीकरण समितीकडून त्यावरून तणाव निर्माण केला जात आहे. राज्यात राज्योत्सव साजरा केला जात असताना बेळगावात काळा दिन पाळून समिती अवमान करीत आहेत, असा आरोप कन्नाडीकांनी केलाय.