NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं होतं. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शरद पवार गटाला घवघवीत य़श दिल्याने निवडणूक आयोगाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारण्याचा अधिकार पक्षाला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोर आज झाली सुनावणी झाली असताना हा निर्णय देण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
"आज आमच्या दिल्लीत 4 केसेस होत्या. 3 केस सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात एक केस होती. ज्याप्रकारे पक्ष आणि चिन्ह पक्षाचे संस्थापक असणाऱ्या शरद पवारांकडून काढून घेण्यात आलं होतं. पण मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनवपूर्वक आभार मानते. जरी शरद पवारांवर अन्याय झाला असला, तर जनतेने त्याची नोंद घेतली. मतांच्या रुपाने शरद पवारांना आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला साथ दिली. आम्ही त्याबद्दल त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मनपूर्वक आभार मानतो," असं शरद पवार म्हणाले आहेत.