'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.

Updated: Mar 7, 2012, 03:10 PM IST

www.24taas.com

 

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे. हे यश माझ्या संपूर्ण टीमचं आहे.

 

आमच्या टीममधल्या सगळ्यांनी फिल्मचं रितसर शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे आमच्यासाठी ती एक शिकण्याची प्रक्रियाच होती. आमची टीम शाळा पास झाली असचं म्हणावं लागेल. माझ्या आई-वडिलांचा या यशात फार मोठा वाटा आहे. शाळा या कादंबरीच्या वाचनानंतर दोन वर्षे मी अभ्यास आणि तयारीसठी घेतला.

 

हा विषय अतिशय नाजूक आणि ट्रिकी आहे त्यामुळे आव्हान मोठं होतं. लहान मुलांच्या डोक्यात शिरून त्यांची सायकोलॉजी मांडायची होती. त्यामुळे कधीही हातातून विषय निसटून जाईल की काय अशी भीतीही वाटत होती.

 

तसंच ही सर्व मुलं पहिल्यांदाच कॅमेरा समोर उभी राहत होती. त्यामुळे या मुलांनी अभिनय करु नये त्यांचा फ्रेशनेस टिपता यावा असा प्रयत्न होता.