'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

Updated: Mar 7, 2012, 10:55 PM IST

 राष्ट्रीय पुरस्कारांवर ‘मराठी ठसा’

www.24taas.com, मुंबई

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी ठसा उमटला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी 'देऊळ' याच चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून 'शाळा' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

 

यंदा राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्यात मराठी माणूस अग्रस्थानी दिसत आहे. त्यात सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊळसाठी गिरीश कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विद्या बालन हिला 'डर्टी पिक्चर'साठी जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मेकअप मॅनचा पुरस्कार विक्रम गायकवाड यांना बालगंधर्व चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

 

'देऊळ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संवादाचा आणखी एक पुरस्कार गिरिश कुलकर्णी याच्या वाट्याला आला आहे. तर सर्वोत्कृष्ट पटकथा 'शाळा' चित्रपटासाठी अविनाश देशपांडे तर 'चिल्लर पार्टी'साठी विभागून देण्यात आला आहे.

 

बालगंधर्व या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी  नीता लुल्ला यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

 राष्ट्रीय पुरस्कारांची यादी

- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म -  (मराठी) देऊळ आणि बायारी   (कन्नड़) विभागून
- सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म: 'I AM'
- सर्वोत्कृष्ट गीत: अमिताभ भट्टाचार्य ('I AM')
- सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी: 'देऊळ’
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-  विद्या बालन  'डर्टी पिक्चर'
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा : 'बाल गंधर्व' (मराठी) नीता लुल्ला आणि 'डर्टी पिक्चर' (हिन्दी) साठी निहारिका खान

- सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी -  'जिंदगी ना मिलेगी दोबारा' साठी  बॉस्को और सिसर
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट: 'RA.One.'
- विशेष जूरी पुरस्कार: अंजन दत्ता
- मराठी फिल्म-  शाळा
- सर्वोत्कृष्ट पटकथा: ‘चिल्लर पार्टी’  विकास बहल आणि नीतीश तिवारी
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा लेखक: अविनाश देशपांडे
- संवाद: गिरीश कुलकर्णी (देऊळ)
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक: रूपा गांगुली
- सर्वोत्कृष्ट पुरूष पार्श्व गायक-   'बाल गंधर्व'साठी आनंद भाटे
- सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: 'स्टेनली का डब्बे' साठी पार्थो गुप्ते आणि चिल्लर पार्टी ग्रुप
- सर्वोत्कृष्ट बाल फिल्म: चिल्लर  पार्टी

सर्वोत्कृष्ट फिल्म समीक्षक: मनोज पी पुजारी
बेस्ट बुक अवार्ड: अनिरुद्ध भट्टाचार्य और 'बालाजी विट्ठल  शीर्षक आरडी बर्मन  द मॅन द म्युझिक '