'लीलां'ची 'लीला', रोमिओ-ज्युलिएटची प्रेमलीला

रोमिओ एन्ड ज्युलिएट यांची प्रेमकथा आपण अनेक हॉलिवूड सिनेमांमधून पाहिली आहे. आणि आता बॉलिवूडमध्येही रोमिओ एन्ड ज्युलिएट यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा येतो आहे. मात्र बॉलिवूडचे हे रोमिओ एन्ड ज्युलिएट आहेत तरी कोण आणि कोण दिग्दर्शित करतंय?

Updated: Feb 2, 2012, 03:03 PM IST

www.24taas.com

 

रोमिओ एन्ड ज्युलिएट यांची प्रेमकथा आपण अनेक हॉलिवूड सिनेमांमधून पाहिली आहे. आणि आता बॉलिवूडमध्येही रोमिओ एन्ड ज्युलिएट यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा येतो आहे. मात्र बॉलिवूडचे हे रोमिओ एन्ड ज्युलिएट आहेत तरी कोण आणि कोण दिग्दर्शित करतंय?

 

इंटेन्स लव्ह स्टोरी सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन येण्यासाठी संजय लीला भन्साली परिचीत आहेत. देवदास, हम दिल दे चुके सनम या सिनेमातून प्रेमाचा वेगळा आविष्कार संजय लीला भन्सालीने सिल्व्हर स्क्रीनवर दाखवला. आणि अशीच एक अजरामर प्रेमकथा संजय लीला भन्साली लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन येत आहे.

 

'धीनतडक' हा रोमॅण्टिक सिनेमा ते बनवत आहेत. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा शेक्सपिअर यांच्या गाजलेल्या रोमिओ अँड ज्युलिएट यांच्या प्रेमकथेवर आधारित असल्याचं बोललं जातं आहे. या म्युझिकल रोमॅण्टिक सिनेमात रोमिओच्या भूमिकेसाठी ते रणवीर सिंगला कास्ट करण्याच्या विचारात आहेत तर ज्युलिएटच्या भूमिकेसाठी त्यांनी करीना कपूरशी बोलणी सुरू केली आहे.

 

मात्र करीना कपूर रणवीर सिंगसह काम करायला तयार होईल का हा यक्षप्रश्न आहे. बेबोच्या स्टारडमपुढे रणवीर सिंगचं मार्केट दुय्यम दर्जाचं आहे त्यामुळे करीनाला रणवीर आपला सिल्व्हर स्क्रीनवरील रोमिओ म्हणून चालेल का? की रोमिओ म्हणून ती आपला बॉयफ्रेन्ड सैफ अली खानलाच पसंती देते आहे. हे पाहणं इंटरेस्टींग ठरेल. तर दुसरीकडे हा सिनेमा म्युझिकल असल्यामुळे या सिनेमाच्या संगीतासाठी इस्माईल दरबार यांचं नाव पुढे येतं आहे.

 

या सिनेमाची कथा गुजरातमधली दाखवण्यात येणार असल्यामुळे या सिनेमाला गुजराती मातीचा गंध असणार हे काही वेगळं सांगायला नको. हम दिल दे चुके सनम सिनेमातही गुजराती कल्चर प्रकर्षाने जाणवलं होतं. स्वत: संजय लीला भन्साली गुजराती असल्यामुळे हा गुजराती फ्लेवर त्यांच्या सिनेमातून दिसतोच असंही इंडस्ट्रीमध्ये बोललं जातं आहे. मात्र काहीही असो या सिनेमातून रोमिओ अँड ज्युलिएटच्या प्रेमाचे रंग आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर पाहायला मिळणार हे नक्की.