मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्करांत दबदबा

राष्ट्रीय पुरस्करांवर दबदबा आहे तो मराठी सिनेमांचा, आणि कलाकारांचा.. देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळानं गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या गिरीश कुलकर्णीचाही सन्मान करण्यात येणार आहे.. गिरीशला सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा पुरस्कारही मिळाला.

Updated: May 3, 2012, 07:55 PM IST

 

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

राष्ट्रीय पुरस्करांवर दबदबा आहे तो मराठी सिनेमांचा, आणि कलाकारांचा.. देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळानं गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या गिरीश कुलकर्णीचाही सन्मान करण्यात येणार आहे.. गिरीशला सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा पुरस्कारही मिळाला.

 

 

५९ वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आज दिल्लीत पार पडतोय. यावेळी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार बालगंधर्व या सिनेमासाठी पटकावला तो आनंद भाटे यांनी. बालगंधर्व याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार मिळाला तो नीता लुल्ला. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा पुरस्कार शाळाच्या अविनाश देशपांडेला मिळालाय. तर शाळा या सिनेमानं सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावलाय. रावनला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टसचा पुरस्कार मिळाल आहे.

 

 

  • राष्ट्रीय पुरस्कारांची यादी
  • - सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म –  (मराठी) देऊळ आणि बायारी   (कन्नड़) विभागून
    - सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म: ’I AM’
    - सर्वोत्कृष्ट गीत: अमिताभ भट्टाचार्य (‘I AM’)
    - सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी: ’देऊळ’
    - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-  विद्या बालन  ’डर्टी पिक्चर’
    - सर्वोत्कृष्ट वेशभूषा : ’बाल गंधर्व’ (मराठी) नीता लुल्ला आणि ‘डर्टी पिक्चर’ (हिन्दी) साठी निहारिका खान- सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी –  ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ साठी  बॉस्को और सिसर
    - सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट: ’RA.One.’
    - विशेष जूरी पुरस्कार: अंजन दत्ता
    - मराठी फिल्म-  शाळा
    - सर्वोत्कृष्ट पटकथा: ‘चिल्लर पार्टी’  विकास बहल आणि नीतीश तिवारी
    - सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा लेखक: अविनाश देशपांडे
    - संवाद: गिरीश कुलकर्णी (देऊळ)
    - सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक: रूपा गांगुली
    - सर्वोत्कृष्ट पुरूष पार्श्व गायक-   ‘बाल गंधर्व’साठी आनंद भाटे
    - सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: ’स्टेनली का डब्बे’ साठी पार्थो गुप्ते आणि चिल्लर पार्टी ग्रुप
    - सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : चिल्लर  पार्टीसर्वोत्कृष्ट फिल्म समीक्षक: मनोज पी पुजारी
  • - बेस्ट बुक अवार्ड: अनिरुद्ध भट्टाचार्य और ’बालाजी विट्ठल  शीर्षक आरडी बर्मन  द मॅन द म्युझिक ’