www.24taas.com, मुंबई
वाढदिवसाला आपल्याकडे साधारणतः नवे कपडे घालायची पद्धत असते. किंवा छान, चांगले कपडे तरी आवर्जून घातले जातात. पण, शर्लिन चोप्रा हिने तर चक्क जन्मदिवसानिमित्त खरोखरच्या 'बर्थ डे सुट'मध्येच स्वतःचे फोटो काढून घेतले. याहून वाह्यातपणाची हद्द म्हणजे शर्लिनने या फोटोंचं ट्विटरवर निर्लज्ज प्रदर्शनही भरवलं आहे.
'बिग बॉस ३' मधील स्पर्धक असणाऱ्या शर्लिनने जिस्म-२च्या पोस्टरची नक्कल केली आहे. पण, मूळ पोस्टरमध्ये निदान पांढऱ्या चादरीमध्ये तरी हिरॉइनने स्वतःला लपवलेलं होतं. पण, शर्लिनने मात्र... वाढदिवसाच्या एक दिवस आधीच शर्लिनने आपला नग्न फोटो ट्विटरवर टाकून लिहीलं आहे, “लवकरच बर्थडे गर्ल आपल्या 'बर्थडे सुट'मध्ये येणार आहे.”
पण, अश्लीलतेची हद्द पार करणारा तो फोटो ट्विटरनेच डिलीट करून टाकला. आपला असा फियास्को होईल याची कल्पनाच नसलेल्या शर्लिनने ट्विटरवर फॅन्सलाच विचारलं, “माझा बर्थडे पिक ट्विटरनेच डिलीट केला का???”
पण, इतकं होऊनही शर्लिनला आपले नग्न फोटो फॅन्ससमोर मांडण्याची हौस काही कमी झाली नाही. निर्लज्जपणामध्ये ट्विटरवर पूनम पांडेला टक्कर द्यायला निघालेल्या शर्लिनने पुन्हा आपले काही नग्न फोटो ट्विटरवर टाकले. आणि या अश्लीलतेचं खापर लोकांच्या माथी मारत शर्लिनने लिहीलं, “तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्या आग्रहाखातर हा आणखी एक माझा फोटो.. मी याच कपड्यात जन्माला आले होते”
आता निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या शर्लिनसमोर खुद्द ट्विटरनेच हात जोडले आहे. तिथे सामान्य भारतीयांची काय कथा ?