'अजंठा'ची भव्य प्रेमकहाणी

बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

Updated: Feb 15, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. यात पारोची भूमिका सोनाली कुलकर्णी साकारत आहे तर रॉबर्टची भूमिका फिलील स्कॉट हा परदेशी कलाकार साकारत आहे.

 

ना.धो. महानोर यांच्या काव्यावर सिनेमाची कथा आधारित आहे. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा सिनेमात वापरण्यात येणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः नितीन देसाईच करत आहेत.

 

अशा या बिग बजेट सिनेमाची उत्सुकता तर साऱ्यांनाच आहे. मात्र, कधीही न ऐकलेली ही प्रेमकहाणी सिल्व्हर स्क्रीनवर कशी रेखाटण्यात आली आहे हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.