जन्म 'स्टारडम'चा

या काळात सिनेमा म्हणजे फक्त विरंगुळा नाही तर तो समाजाच्या जीवनाचा एक भाग झाला. अभिनेते स्टार झाले तेही याच काळात. स्टारडमची ख-यअर्थानं सुरुवातंही झाली तीही याच काळात

Updated: May 3, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

1950-1970

 

 

 

राज कपूर नावाच्या झंजावातानं सिनेसृष्टीत 1950 पन्नास आधीच पदार्पण केलं होतं. बरसात मधून त्यानं त्याची झलक  दाखवून दिली होती.. वेळ होती ती त्यानं आपली जादू दाखवण्याची..राज कपूरची ही जादू दिसली ती आवारा मधून... श्री चारसो बीस, जागते रहो, जिस देश में गंगा बेहती है, अनाडी  अशा सिनेमातून राज कपूरनं आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अभिनेत्री नर्गिस आणि त्यांची जोडी स्क्रीनवर खूपचं गाजली.. अभिनया बरोबरच राज यांनी आपली निर्मिती संस्था सुरु केली ती अवघ्या 24 व्या वर्षी...प्रवाहापेक्षा वेगळ्या विषयांनी नेहमीच राज यांना खुणावलं. म्हणूनच या शोमॅनच्या पुढच्या पुढल्या पिढ्यांनीही कपूर घरण्याचाच वारसा पुढे सुरु ठेवला...

 

याच दरम्यान गुरु दत्तनं साहीब बिबी और गुलाम, प्यासा,कागज के फूल अशा अजरामर कलाकृतींची भेट प्रेक्षकांना दिली. त्यानं दिग्दर्शित केलेल्या चौदवी का चॉंद, सी आयडी, आर पार, साहेब बिबी और गुलाम या सिनेमांनी पुढल्या अनेक दिग्दर्शकांच्या पिढ्यांनाही समृद्ध केलं. याच काळात सिनेसृष्टीला ख-य अर्थानं आनंद गवसला.... देव आनंद नावाच्या अवलियानं आपल्या स्टाईलनं तरुणांना वेड लावलं.. रोमान्स करावा तर तो देवआनंदनंच...

 

देवानंद या दशकातला स्टाईल आयकॉन ठरला.  कधी टॅक्सी ड्रायव्हर बनून कधी सीआयडी बनून तर कधी फंटूश बनून देवआनंदनं आपल्या फॅन्सना वेड लावलं.. हम दोनो, नौ दो ग्यराह अशा देवआनंदच्या ब-याच फिल्म्स एकामागोमाग एक हिट झाल्या. शहरी तरुणांना देव आनंद खुणावत असताना ग्रामीण प्रेक्षकांना आकर्षित केलं ते दिलीप कुमार या चेह-यानं.. देवदासमध्ये झळकलेल्या दिलीप कुमारच्या घरी निर्मात्यांच्या रांगा लागल्या..आझाद, दाग, मधुमती, गंगा जमुना, नया दौर, कोहिनूर, राम और श्याम अशा दिलीप कुमारच्या अनेक फिल्म्स हिट झाल्या.. 19 साठ मध्ये आललेल्या के आसिफच्या मुघल ए आझमनंतर इतिसाह घडवला... मुख्य म्हणजे 1950 ते 1970 या काळात किती अभिनेते आले आणि गेले तरीही सिनेसृष्टीवर सद्दी होती ती देवआनंद, राजकपूर आणि दिलीप कुमार या तीन स्टार्सचीच. .

 

स्रीप्रधान  सिनेमाची निर्मिती या काळात फारशी होत नसली तरीही याच काळानं सिनेसृष्टीला गुणी अभिनेत्री दिल्या... नर्गिस सारखी सशक्त अभिनयाची शिदोरी गाठीशी असणारी उत्कृष्ट अभिनेत्री याच काळातली.. नर्गिसच्या मदर इंडियानं तर हॉलिवूडचा दरवाजाही ठोठावला.....ट्रॅजिडी क्वीन म्हणवणारी मीना कुमारी याच काळातली... नुतननंही याच काळात कॅमेरासमोर बिनधास्तपणे वावरत आपलं वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. जीची एक झलक पाहून प्रेक्षक सिनेमगृहात गायाळ व्हायचे त्या मधुबालानंही याच काळात आपल्या दैवी सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर चालवली. तिची आणि नटखट किशोर कुमारची जोडी स्क्रीनवर हिट ठरली... याच काळात  वहिदा रेहमानच्या सोज्वळ अभिनयानंही प्रेक्षकांना वेड लावलं...

 

विशेष म्हणजे याकाळातच मराठीतलं एक नाव हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावलं ते म्हमजे व्ही शांताराम..झनक झनक पायल बाजे... दो आंखे बारह हाथ.. नवरंग अशा सिनेमांनी शांतारामांनी हिंदी सिनेसृष्टीला आपली  दखल घ्यायला लावली..

या काळातच  सिनेमानं धारण केलं रंगांच लेणं...स्टुडिओतला सिनेमा हळू हळू निसर्गरम्य वातावरणात शूट होऊ लागला... वेगवेगळी लोकेशन्स हे देखिल प्रेक्षकांसाठीचं एक आकर्षण होऊ लागलं...आणि सिनेमा बिग बजेट होऊ लागला..

 

शम्मी कपूरचा जंगली आला आणि डान्सची वेगळी परिभाषाच शम्मीनी निर्माण केली...शम्मीच्या अभिनया पेक्षा प्रेक्षक  त्यांच्या डान्सिंग स्टाईलचे फॅन झाले..एकीकडे व्यावसायिक सिनेमांना लोकप्रियता मिळत असतानाच बिमल रॉयचा दो भिगा जमीन, सत्यजित रें चा पथेर पांचाली या सराख्या सिनेमांनीही सामाजिक विषयाची हाताळणी करत समांतर सिनेमाची चळवळ सुरुच केली...

 

 

Tags: