कतरिनाच्या अदा २ कोटींच्या

३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनचे वेध आत्तापासूनच सगळ्यांना लागले असल्याचं दिसतंय.कारण यावर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री आपला डान्स तडका दाखवण्यासाठी कतरिना कैफला २ कोटी रुपयांची ऑफर करण्यात आल्याची चर्चा आहे.

Updated: Dec 13, 2011, 05:55 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

३१ डिसेंबरच्या  सेलिब्रेशनचे वेध आत्तापासूनच सगळ्यांना लागले असल्याचं दिसतंय.कारण यावर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री आपला डान्स तडका दाखवण्यासाठी कतरिना कैफला २ कोटी रुपयांची ऑफर करण्यात आल्याची चर्चा आहे.

 

कतरीना कैफच्या कातिल अदेवर सारेच फिदा झाले आहेत. ‘शीला की जवानी’ या गाण्यावर कतरिनाने आपला असा काही जलवा दाखवला की सर्वत्र फक्त कतरिनाचीच क्रेझ निर्माण झाली. अगदी बॉलिवूडच्या मुन्नीलाही या शीलाने टफ फाईट दिली. त्यामुळे गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनलाही कतरिनाला अनेक ऑफर्स आल्या मात्र या सगळ्या ऑफर्स नाकारत कतरिनाने  नवंवर्षाचा स्वागत आपल्या कुटुंबासह करणं पसंती केलं. याचा फायदा इतर अभिनेत्रींना झाला. कतरिना परदेशी निघून गेल्याने मल्लिका शेरावत, बिपाशा बासू, मुग्धा गोडसे आणि मलायका अरोरा खान यांनी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरची रात्र आपल्या डान्स जलव्याने दणाणून सोडली.

 

मात्र यावर्षी या अभिनेत्रींवर मात करण्याची संधी कतरिना कैफकडे आयती चालून आलीय.कारण यावर्षी ३१ डिसेंबरला आपल्या डान्सचा तडका दाखवण्यासाठी कतरिनाला दोन कोटींची ऑफर देण्यात आलीय. नववर्षाचं स्वागत करताना ३१ डिसेंबरची रात्रं दणाणून सोडणं हे काही नवं नाही मात्र जास्तीत जास्त गर्दी आपल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये खेचली जावी यासाठी हे हॉटेल मालक बॉलिवूड सेलिब्रिंटींना अधिक पसंती देऊ लागले आहेत आणि यासाठी ते कोटीच्या कोटी बोली लावण्यासही तयार आहेत. त्यामुळेच यावर्षी कतरिनाला २ कोटींची ऑफर देण्यात आल्याने कॅटच वर्चस्व आजही बॉलिवूडमध्ये टॉपला असल्याचं दिसून येतंय. कतरिनासह या वर्षी मल्लिका शेरावतही आपला जलवा दाखवणारेय मात्र मल्लिकाला मिळणारं मानधन की कतरिनाच्या तुलनेचं नसल्याचं बोललं जातंय. मात्र यावर्षी तरी कतरिना ही ऑफर स्वीकारते का की या वर्षीही ती आपल्या कुटुंबासह नवंवर्षाचं स्वागत कऱणं पसंत करते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.