राजीव पाटील वळले रंगभूमीकडे

जोगवा' आणि 'पांगिरा' या दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमांमधून आपली दखल घ्यायला लावली ती दिग्दर्शक राजीव पाटीलनं. सिनेमांमध्ये व्यस्त असलेला राजीव आता रंगभूमीवर 'प्रियांका आणि दोन चोर' हे नवं नवं नाटक घेऊन येतोय.

Updated: Nov 22, 2011, 01:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'जोगवा' आणि 'पांगिरा' या दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमांमधून आपली दखल घ्यायला लावली ती दिग्दर्शक राजीव पाटीलनं. सिनेमांमध्ये व्यस्त असलेला राजीव आता रंगभूमीवरही एक नवं नाटक घेऊन येतोय. 'प्रियांका आणि दोन चोर' या नव्या नाटकाचं दिग्दर्शन राजीव करतोय.

 

लोकेश गुप्ते, राहुल मेहेंदळे आणि पूर्वा पवार यांच्या या नाटका प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या नाटकाचा मुहूर्त पार पडला. चंद्रकांत लोकरेंनी नाटकची निर्मिती केलीय. आत्तापर्यंत गंभीर विषाची हाताळणी करणाऱ्या राजीवचं हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि तेही विनोदी. त्यामुळे डिसेंबर मध्ये रंगभूमीवर येणाऱ्या या नाटकाबाबत राजीव फारच उत्साहात आहे.आता राजीवच्या सिनेमांना मिळालेला प्रतिसादच त्याच्या नाटकांलाही मिळतो का हेच पहायचं.