मुंबई : ZEEL-SONY Merger: झी एंटरटेनमेंट (ZEEL) आणि सोनी पिक्चर्स (SPNI) च्या मर्जरचं इंडस्ट्रीने स्वागत केलं आहे. शेयर बाजार देखील आनंदीत झाला. शेयरहोल्डरचा देखील विश्वास आहे. पण, इनवेस्को अजूनही झी एंटरटेनमेंटचं व्यवस्थापन समिती बदलण्यावर अडून आहे. याबाबतीत काही मीडिया संस्था ZEE ला उलट प्रश्न करीत आहेत. झी एंटरटेनमेंटने प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं, काही मीडिया संस्थांना वाटतं. पण अशा बातम्या बिनबुडाच्या आहेत.
कारण ZEELने SONY सोबत डील करुन शेअर धारकांसोबत आपला प्लान सादर केला आहे. इंडस्ट्रीसमोरही स्पष्टता आहे. पण इनवेस्कोच्या मनात काय चाललं आहे, याविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागे नेमका कुणाचा हात आहे? या प्रश्नावर इनवेस्को का पळ काढतंय?
झी एंटरटेनमेंटच्या प्रकरणात इनवेस्को स्वताच्या फेऱ्यात अडकल्या सारखं दिसून येत आहे. कारण इनवेस्कोकडे याचं कोणतंही उत्तर नाहीय, मग इन्वेस्को कुणाच्या इशाऱ्यावर काम करतंय. कुणाचा मोहरा बनून गुंतवणुकदारांना संभ्रमात टाकण्याचं काम इनवेस्को करतंय. असे अनेक प्रश्न इनवेस्कोच्या बाबतीत उभे ठाकले आहेत. इनवेस्कोने संपूर्ण प्रकरणात कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नाही.
ZEEL-SONY च्या मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीचे सीईओ आणि एमडी देखील पुनीत गोयंका असतील. हा विश्वास सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने देखील दिला आहे. पण इनवेस्कोला ही बाब का खटकतेय, इनवेस्को मॅनेजमेंटमध्ये नेमकं कुणाला ठेवणार आहे, हे का नाही बोलत?
इनवेस्कोकडे कोणताही ठोस बोर्ड प्रस्ताव नाही तसेच एंटरटेनमेंट इंडस्ट्री संबंधित कामकाजाचा कोणताही अनुभव नाही. मग प्रश्न असा आहे की इनवेस्कोच्या मनात आहे तरी काय? एकीकडे झी एंटरटेनमेंटच्या सध्याच्या बोर्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी आणि प्रसिद्ध नावं आहेत. तर दुसरीकडे इनवेस्कोच्या बोर्डात असं कोणतंही नाव नाही, ज्यांना मीडिया किंवा एंटरटेनमेंट क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. तर कोणत्या आधारावर ही लोकं बोर्डात असणार आहेत. इनवेस्कोने पारदर्शकता पाळून सर्व काही समोर आणलं पाहिजे.
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइसेस लिमिटेडचे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा (Dr. Subhash Chandra - Founder, Zee Entertainment Enterprises Limited) यांनी या बाबतीत एक व्हिडीओने प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी म्हटलं आहे, ''ZEEL बद्दल जेवढे काही प्रश्न आहेत, त्याविषयी मी एवढंच सांगू इच्छितो, या कंपनीला पुनीत गोयंका चालवू द्या, नाही तर कुणी इतर, पण तो व्यक्ती असा असावा, जो या संस्थेला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि शेअर धारकांनाही याचा फायदा मिळेल. मागील ३० वर्षापासून मी या कंपनीला कष्टाने उभे केले आहे. याने मला आज न कोणता फायदा होणार आहे, ना कोणतं नुकसान. मी ही मुलाखत CNBC, मनी कंट्रोलच्या सहकाऱ्यांनाही देऊ इच्छित होतो. पण ते घेतील, दाखवतील नाही दाखवतील माहित नाही. कारण त्यांना देखील यात काही तरी खासगी फायदा दिसून येत आहे''.
सुभाष चंद्रा यांनी म्हटलं आहे, इनवेस्को खूप चांगले इन्वेस्टर आहे. ZEEL प्रकरणात ते हे पारदर्शकपणे हे सांगत नाहीत की, याविषयी ते काय करतील. मॅनेजमेंट कुणाच्या हाती देतील. पुनीत गोयंका यांना बाजूला करायचं असेल तर करा, पण मॅनेजमेंट कुणाच्या हाती देतील हे ते का सांगत नाहीत. काय इनवेस्कोने कुणाशी डिल करुन ठेवली आहे. बोर्डमध्ये ६ डायरेक्टर्सच्या नावाचा प्रस्ताव आहे, त्यांचं बँक ग्राऊँड काय आहे. त्यांचा कोणत्या एक्स कंपनीशी संबंध आहे? कुणी घेऊ इच्छितो का? इनवेस्कोने यावर मोकळेपणाने बोललं पाहिजे. यानंतर शेअर धारकांना ठरवू द्या, त्यांना इनवेस्को सोबत जायचंय का ZEEL-SONY च्या डीलसोबत.
मीडियात येणाऱ्या वृत्तात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, ZEEL रेग्युलेटर्सला प्रश्न का विचारत नाहीत. यावर उत्तर देताना सुभाष चंद्रा यांनी म्हटलं आहे, रेग्युलेटर्स पहिली जबाबदारी मायनॉरिटी शेअरहोल्डरच्या हिताची रक्षा करतील. त्यांना देखील इनवेस्कोला सवाल केले पाहिजेत की याबाबती इनवेस्कोने पारदर्शकता ठेवली पाहिजे. छोट्या शेअरधारकांना ठरवू द्या, त्यांना ZEEL-SONY सोबत जायचंय की इन्वेस्कोच्या प्लानसोबत, ते आतापर्यंत समोर येऊ शकलेलं नाही.