मुंबई : शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संबंधित साधरण 1 डझन बनावट कंपन्यांचे कागदपत्र ताब्यात मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जाधव यांनी या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची घेवाणदेवाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बोगस कंपन्यांवर कंपनी अॅक्ट अंतर्गत काही मोठ्या त्रूटी आढळून आल्याचे समजते.
मागील तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकून अनेक कागदपत्रे हस्तगत केली होती.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने जाधव यांच्या बनावट कंपन्यांबाबत चौकशी सुरू केली आहे. साधारण 12 बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
बोगस कंपन्यांनी कंपनी ऍक्टचे उल्लंघन केल्याने, अंधेरी येथील एका कंपनीला नोटीस देण्यात आली. परंतू त्या पत्यावर कंपनीच अस्तित्वात नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबधित जाधव आणि इतरांची चौकशी सुरू केली आहे.