युक्रेनमध्ये अडकलेले आणखी 200 जण मायदेशी परतले; मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत

 Russia - Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज सकाळी बुखारेस्टवरून मुंबईत आलं.या विमानातून जवळपास 182 विद्यार्थी मुंबईत परतले.

Updated: Mar 1, 2022, 08:22 AM IST
युक्रेनमध्ये अडकलेले आणखी 200 जण मायदेशी परतले; मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत title=

मुंबई : Russia - Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज सकाळी बुखारेस्टवरून मुंबईत आलं.या विमानातून जवळपास 182 विद्यार्थी मुंबईत परतले. केंद्रीय मंत्री नारायण राणे या विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित होते. नारायण राणे यांनी थेट विमानात जाऊन या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर मोठं आक्रमण केल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथून परत आणण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन गंगा लॉंच केले आहे. 

ऑपरेशन गंगाच्या नियोजनानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. आजही एअर इंडियाच्या विमानातून 182 विद्यार्थी मुंबईत परतले.

युद्धविरामाची चर्चा निष्फळ

रशिया आणि युक्रेन यांच्यात काल बेलारूस सीमेवर युद्धविरामाबाबत चर्चा झाली. चर्चेच्या पहिल्या फेरीत अपेक्षेप्रमाणे निष्कर्ष निघाला नाही. पण दुस-या फेरीबाबत सल्लामसलत करण्यासाठी दोन्ही देशांची शिष्टमंडळं आपापल्या राजधानीकडे माघारी गेली आहेत. 

चर्चेची दुसरी फेरी येत्या काही दिवसांतच होणार आहे. दोन्ही शिष्टमंडळांनी वादांच्या काही मुद्द्यांवर बातचीत केली असं रशियन बाजूने म्हटलंय. चर्चेची दुसरी फेरी पोलंड- बेलारूस सीमेवर होणार आहे. 

दरम्यान रशियन हल्ल्याचा वेग काहीसा कमी झाला असला तरी रशियाने काल युक्रेनच्या आग्नेय भागातील झॅपोरिझ्झ्या या प्रदेशातील बर्गियानस्क आणि एनरहोदर ही दोन शहरं ताब्यात घेतली आहेत. तसंच या भागातल्या झॅपोरिझ्झ्या अणुउर्जा प्रकल्पाचा ताबाही रशियाने घेतल्याचा दावा केलाय.