मुंबई : मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.
ट्रॅफिकचे नियम मोडूनही काही लोकं पोलिसांशी हुज्जत घालतात. पोलिसांवर अनेक प्रकारचे हल्ले देखील यापूर्वी झाले आहेत. तर अनेकदा ट्रॅफिक पोलिसांना शिवीगाळ झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. यावर आता अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात येणार आहे.