डोकानीयाला सोडवण्यासाठी फडणवीस का गेले ? - नवाब मलिक

 भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले ? 

Updated: Apr 18, 2021, 01:06 PM IST
डोकानीयाला सोडवण्यासाठी फडणवीस का गेले ? - नवाब मलिक  title=

मुंबई : 50 हजार रेमडेसीवीर वाटणार असं ट्विट भाजप नते करतात, मात्र हा साठा सरकारला का देत नाहीत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला. रेमडेसीवीर सरकारला मिळू नये अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले ? हे स्पष्टीकरण द्यावे. साठा या लोकांकडे असल्याचे ते म्हणाले.

राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा असून उत्पादन करण्यास परवानगी असून निर्यातीवर बंदी आहे. 7 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी असताना रेमडेसीवीर विकण्याची परवानगीसाठी सरकारला विचारणा केली गेली. ब्रूक फार्माचे मालक FDA आयुक्तांना भेटल्याची माहिती मलिक यांनी दिली. साठा आहे, पुरवठा करु शकतो याबाबत त्यांनी चर्चा केली.

राजेश डोकानीया यांना बोलावून पोलिसांनी माहिती घेतली. मात्र फडणवीस, लाड, दरेकर, अळवणी हे रात्री पोलीस ठाण्यात गेले. डोकानीयाला सोडवायला दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार का गेले? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. 

यात काही गडबड आहे, एखादा नेता फोनवर माहिती घेऊ शकतो, मात्र फडणवीस स्वतः गेले. लोकल मार्केटिंगसाठी भाजपने परवानगी मागितली. मात्र लोकल परवानगीची मागणी नाकारली होती. शासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत इंजेक्शन पोहचतील असा निर्णय झाला.

FDA ने राजेश डोकानीया यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना सोडून दिले.पोलीस काळाबाजार रोखण्यासाठी काम करतात. डोकाणीला सोडवण्यासाठी फडणवीस का गेले ? भाजप का घाबरते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान ऑक्सिजनचा पूरवठा करू, अधिक मदत करू या डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेचं स्वागत करत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x