मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने ( State Election commission ) येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ( Suprime Court ) राज्य निवडणूक आयोगाला दिले.
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, उल्हासनगर, पिपंरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांचा कालावधी संपला आहे. येथे प्रशासक नेमून त्यालाही 6 महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वेळेतच घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला.
राज्य सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत अवधी मागितला आहे. पण, कोर्टाने अवधी देण्यास नकार दिला आहे. पावसाळ्याचे कारण देत राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या. पण, पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
यावर राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. या अर्जात राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे घेण्यात याव्यात असे म्हटले आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तीन करणे दिली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. तसेच, प्रभाग रचना अद्याप पूर्ण नाही. पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण आहे आणि मतदार याद्या, वॅार्ड रचना करण्यास वेळ लागणार आहे अशी तीन कारणे दिली आहेत.