मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला आज जामीन मिळणार की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज जर आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर त्याच्या कोठडीत आणखी वाढ होईल. दरम्यान एनसीबीने आर्यनचे व्हाट्स ऍप चॅन न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
एएनआयने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये पोलिसांना ड्रगशी संबंधित व्हॉट्सऍप चॅट सापडले आहेत जे आर्यन खान आणि डेब्यू अभिनेत्री दरम्यान असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
Drugs-on-cruise case | Mumbai NCB says it has submitted WhatsApp chats of Aryan Khan in the court.
Police has found a drug related WhatsApp chats that are allegedly between Aryan Khan and a debut Actress: NCB
— ANI (@ANI) October 20, 2021
आज कोर्टात काय होऊ शकतं
जामीन मंजूर झाल्यास कागदोपत्री कारवाईनंतर आर्यन खानची सुटका होऊ शकते. मात्र, अर्ज नामंजूर झाल्यास आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. जामीन नाकारल्यास आर्यन खानचे वकील हायकोर्टात जाऊ शकतात.
आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानला सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthar Road Jail) आहे.