मोदी-पवारांची भेट नेमकी कशासाठी?

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 

Updated: Nov 23, 2019, 09:27 AM IST
मोदी-पवारांची भेट नेमकी कशासाठी? title=

 मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर' ही भेट असल्याचं म्हटलं जातं होतं. पण आज 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता भाजपा आणि अजित पवारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन केलं आहे. 

अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असून अजित पवारांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना माहित होत का? असा प्रश्न तर उभा राहतच आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? हा प्रश्न देखील उपस्थित राहत आहे. (महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा 'राजकीय भूकंप') 

शरद पवारांना 'गेम चेंजर' म्हटलं जातं. तर शरद पवारांनीच या संदर्भात महत्वाचं पाऊल उचललं का? असा प्रश्न उभा राहत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. शरद पवार आता सिल्वर ओकवरून राष्ट्रवादीच्या आमदारांशी फोनवर चर्चा करत आहेत, असं म्हटलं जातं आहे. (मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

शरद पवारांची प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न गुलदस्त्यातच राहणार आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 10 आमदार असल्याची देखील चर्चा आहे. पण शपथविधीवेळी फक्त अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार उपस्थित होता. यामुळे राष्ट्रवादीची नेमकी काय खेळी आहे? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.  (पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन)

मात्र एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या प्रकाराची शरद पवारांना कल्पना होतीच. तसेच राष्ट्रवादीचे 22 आमदार अजित पवारांसोबत असल्याच म्हटलं जातं. आहे. आता शरद पवार स्वतः समोर येऊन प्रतिक्रिया देत नाहीत तोपर्यंत हा संभ्रम दूर होणार नाही.