मुंबई : मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे. घरगुती ग्राहकांना आधी ४.६६ रुपयांना मिळणारं पाणी आता ४.९१ रुपयांना मिळणार आहे. हे दर प्रतिहजार लिटर पाण्याचे असणार आहेत. एकूण जल आकाराच्या ७० टक्के रक्कम ही मलनि:सारण आकार म्हणून आकारली जाणार आहे.
याआधी २०१३ला ८ टक्के आणि २०१५लाही ८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. पाणी दरवाढ केल्यामुळे वर्षाला महापालिकेच्या तिजोरीमध्ये ६८ कोटी रुपये जादा येणार आहेत. जुलै २०१७ ते मार्च २०१८ या ९ महिन्यांच्या काळात महापालिकेच्या तिजोरीत ५४ कोटी रुपये येतील.
निवासी प्रकार | जुने दर | नवे दर |
घरगुती ग्राहक | ४.६६ रू | ४.९१ रू |
बिगर व्यावसायिक संस्था | १८.६६ रू | १९.६७ रू |
व्यावसायिक संस्था | ३४.९९ रू | ३७.८८ रू |
उद्योग, कारखाने इ. | ४६.६५ रू | ४९.१६ रू |
रेसकोर्स, तारांकीत हॉटेल्स | ६९.९८ रू | ७३.७५ रू |
शितपेये,बाटलीबंद पाणी उत्पादक | ९७.२० रू | १०२.४४ रू |