नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनीच चुलत भावाचा खून केला.  त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

Updated: Jan 3, 2023, 05:46 PM IST
नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप title=

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर (Union Minister Narayan Rane) ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे यांनी चुलत भावाचा (Brother) खून (Murder) केला असून त्यांची नार्को टेस्ट (Narco Test) करा अशी  मागणी देखील विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनी चुलत भावाचा खून केला. त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी नारायण राणेंवर फक्त खुनाचा आरोपच केला नाही तर त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट करा म्हणजे अनेक खुनांना वाचा फुटेल, असा दावाही राऊत यांनी केला आहे. 

आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सातत्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करत आहेत. यावरुनच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशानात ( Maharashtra Winter Session 2022 ) चांगलाच गदारोळ माजला होता. शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी नितेश राणेंनी केली होती. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असं राणे म्हणाले होते. 

दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.  या सगळ्यावरुनच आता विनायक राऊत देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.