VIDEO : महिलेनं मारली धावत्या रेल्वेसमोर उडी पण...

टिळक नगर रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं आत्महत्या करण्यासाठी धावत्या ट्रेन समोर उडी मारली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 27, 2018, 02:31 PM IST

 

मुंबई : टिळक नगर रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं आत्महत्या करण्यासाठी धावत्या ट्रेन समोर उडी मारली.

मात्र सतर्क आरपीएफचे जवान आणि मोटार मनच्या समय सूचकतेमुळे त्या महिलेचा जीव वाचला. टिळक नगर रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली.

दरम्यान, एक महिला ट्रेनची वाट पाहात टिळक नगर रेल्वे स्टेशनवर उभी होती. मात्र ट्रेन येताच तिनं धावत्या ट्रेनसमोर उडी मारली. 

ही घटना आरपीएफ जवानानं पाहिलं आणि क्षणाचाही विलंब ना लावता मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा करत त्या महिलेला मोठ्यानं ओरडत बाजूला होण्यास सांगितलं.

मोटरमननं गाडीला त्वरित ब्रेक लावले... आणि आत्महत्येच्या विचारानं उडी घेतलेल्या महिलेनं आपला विचार बदलत ती पत्रीच्या बाजूला आली आणि तिचे प्राण वाचले.

घरगुती वादाच्या कारणानं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल त्या महिलेनं उचललं होतं. मात्र, आत्महत्या हा उपाय नाही हेही तितकचं सत्य आहे.