मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले, व्यापारी, शेतकरी हवालदिल

उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत. 

Updated: Nov 9, 2018, 11:40 PM IST
मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले, व्यापारी, शेतकरी हवालदिल title=

कल्याण : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात आल्याने भाव घसरले आहेत. व्यापाऱ्यांना कमी किंमतीत भाज्या विकाव्या लागत आहेत. त्यामुळे व्यापारी हैराण झालेयत. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मेहनतीचा किमान मोबदला मिळेनासा झालायं. त्यामुळे त्यांचंही मोठ नुकसान झालंय. 

५ ते १० रूपये किलो

मात्र उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत.

भेंडी, फ्लॉवर, कोबी, दुधी, कारली, वांगी, ढोबळी मिरची या भाज्या होलसेल बाजारात ५ ते १० रूपये किलो या दराने विकाव्या लागत आहेत.

तरीही उठाव नसल्याने अखेर या भाज्या व्यापाऱ्यांना फेकाव्या लागत आहेत.

मेहनतीने उभा केला भाजीपाला रस्त्यावर फेकून देणं शेतकऱ्यांच्याही जीवावर येण्यासारख आहे.

शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही भाव मिळत नसल्याने व्यापारी हवालदिल झालेत.