Video : पत्नीला एक्स्प्रेस खाली ढकलणाऱ्या पतीला 12 तासात अटक, धक्कादायक कारण आलं समोर

झोपेत असलेल्या पत्नीला एक्सप्रेस खाली ढकलून काढला होता पळ, पतीची क्रूरता सीसीटीव्हीत कैद

Updated: Aug 23, 2022, 05:59 PM IST
Video : पत्नीला एक्स्प्रेस खाली ढकलणाऱ्या पतीला 12 तासात अटक, धक्कादायक कारण आलं समोर title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : वसई रेल्वे स्थानकात (Vasai Railway Station) काल एक धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नीला धावत्या एक्स्प्रेसखाली ढकलून एका पतीनं आपल्या दोन मुलांसह पळ काढला होता. हत्येची ही थरारक घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. आरोपीचा शोध घेणं पोलिसांसमोर कठिण आव्हान होतं. मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीचा छडा लावला,

नेमकी काय होती घटना?
रेल्वे स्थानकावर झोपेत असलेल्या पत्नीला उठवून एक्सप्रेस ट्रेन (Express Train) खाली ढकलल्याचा धक्कादायक प्रकार वसई रेल्वे स्थानकात समोर आला होता. रात्रीच्या सुमारासा आरोपी आपली पत्नी आणि दोन मुलांसह वसई रेल्वे स्थानकात आला होता.  पहाटे 4 च्या दरम्यान अवध एक्स्प्रेसखाली (Avadh Express) आरोपीने झोपेत असलेल्या पत्नीला ढकलून दिलं, यात तिचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला होता. पत्नीला ट्रेन खाली ढकलून सोबत असलेल्या दोन मुलांसोबत पतीने तिथून पळ काढला.

हत्येचं धक्कादायक कारण
पोलिसांकडे सीसीटीव्हीशिवाय कोणताही पुरावा नव्हता. असं असतानाही पोलिसांनी अथक प्रयत्न करत आरोपीचा अवघ्या 12 तासात छडा लावला. आज पत्रकार परिषद घेत पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. तसंच पत्नीवर चारित्र्याचा संशय आल्याने हत्या केल्याची उघड झालं आहे.