गर्भवती महिला घेऊ शकतात लस, पण मुंबईत अजूनही एकही गर्भवती लस घेण्यास तयार नाही..का?

खेरतर मुंबई शहरात गर्भवती महिलांना लसीकरण करण्यासाठी सगळ्या शहरांत्या तुलनेत लवकर संमती दिली गेली.

Updated: Jun 3, 2021, 07:04 PM IST
गर्भवती महिला घेऊ शकतात लस, पण मुंबईत अजूनही एकही गर्भवती लस घेण्यास तयार नाही..का? title=

मुंबई : कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंत अनेक लोकांनी कोरोना लसीकरण केले. सुरवातीला फ्रंटलाईल वर्करपासून देशात लसीकरण मोहिम सुरु झाली, त्यानंतर, 65 वर्षांवरील नागरीक,  45 वर्षांच्या नागरीकांना लसीकरण असे करत करत आता जवळ जवळ 18 वर्षांवरील सगळ्यांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. त्यांनंतर सरकारने लहान मुलांना स्तनपन करणाऱ्या महिलांबरोबरच  गर्भवती महिलांनाही कोरोना लसीकरण करण्यास संमती दिली. त्यानंतर मुंबईत 1032 स्तनपान करणाऱ्या महिलांनी आतापर्यंत लस घेतली आहे. परंतु एकही गर्भवती महिला अद्याप लस घेण्यासाठी पुढे आलेली नाही.

खेरतर मुंबई शहरात गर्भवती महिलांना लसीकरण करण्यासाठी सगळ्या शहरांत्या तुलनेत लवकर संमती दिली गेली. त्यामध्ये सांगण्यात आले की, गर्भवती महिलांनी त्यांच्या गायनाकॉलोजिस्टचे संमती पत्र घेऊन ते लसीकरण केंद्रावर दाखवायचे. या पत्रात तुम्ही लस घेण्यासाठी फीट आहात असे लिहिले जाईल. त्यानंतर त्यामहिला लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण पूर्ण करु शकतात. परंतु अद्याप एकही गर्भवती महिला लस घेण्यासाठी पुढे आलेली नाही.

गर्भवती महिला लसीकरण का करत नाहीत? या मागची तीन कारणे समोर आली आहेत. एक म्हणजे गर्भवती महिलांमध्ये जागरुकतेच्या अभावामुळे लसी संबंधीत संभ्रम, दुसरे म्हाणजे लसीकरण केंद्र स्वत: वरील कामाचा बोझा वाढवू इच्छीत नाहीत आणि तिसरे म्हणजे डॉक्टर आपल्या जिम्मेदारीपासून पळ काढत आहेत.

लसीकरण केंद्र का जागरुकता वाढवत नाहीत?

लसीकरण केंद्र आपले काम वाढवू इच्छीत नाहीत. कारण जर गर्भवती महिलांचे लसीकरण सुरु केले गेले, तर त्यांच्यासाठी त्यांना वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. महिलांचे रिपोर्ट तपासणे त्यांचा कंसेंट फॉर्म भरणे या सगळ्या गोष्टींचा भार त्यांच्यावर पडणार आहे. आधीच वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेतील लोकांवर कामाचा बोजा वाढला आहे. त्यात त्यांची आणखी काम करण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे ते या सगळ्यापासून लांब रहात आहेत.

डॉक्टर का गर्भवती महिलांना लस घेण्याचा सल्ला देत नाहीत?

डॉक्टरांचे असे म्हणने आहे की, केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर कोणतीही गाइडलाईन का काढली नाही? त्यांनी हा निर्णय डॉक्टरांकडे का सोपवला? कारण कोणत्याही दुर्घनेला केंद्र सरकारला सामोरे जायचे नाही, तर मग डॉक्टर तरी का या सगळ्यासाठी पुढाकार घेतील? त्यात काही डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, कोणतीही गर्भवती महिला आमच्याकडे सर्टिफिकेट मागायला येत नाही, तर मग आम्ही तरी कसे त्यांना सांगणार?

द फेडरेशन ऑफ ऑब्सटेट्रिक आणि गायनेकॉलोजिकल सोसायटी ऑफ इंडियाने (FOGSI) या गर्भवती महिलांच्या लसीकरण संबंधित लोकाच्या मानातील आशंका नाकारली आहे. त्यांनी गर्भवती महिलांना लस घेण्याचे दुहेरी फायदे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी असे सांगितले की, गर्भवती महिलेने लस घेतल्याने आई आणि मुलं दोघांनाही कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी लस घेऊन आपल्य़ा सोबत आपल्या बाळाचेही कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करा.