Uddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

Updated: Feb 17, 2023, 09:04 PM IST
Uddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे  title=

Uddhav Thackeray on Shivsena and Dhanushyaban : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) यांच्या गटाला मिळालं आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
आज निवडणुक आयोगाने जो निकाल दिला आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे, अशी पंतप्रधान मोदींना घोषणा करायला हरकत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. आजचा निर्णय अनपेक्षित आहे, सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तो निकाल लागत नाही, तो पर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही सांगत होतो.  चोराला राज्यमान्यता देणं हे काही जणांना भूषणावह वाटत असेल पण शेवटी चोर हा चोरच असतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

आज मिंदे गटाची दैनीय अवस्था झाली आहे, त्यांना स्वत: लढण्याची हिम्मत नाहीए. मी त्यांना आव्हान दिलं आहे हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, अगदी लोकसभेपासून महापालिका निवडणूक एकत्र घ्या, पण निवडणूक घेण्याची त्यांची हिम्मत झाली नाही, आता अशी शक्यता वाटतेय, ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना मिंदे गटाला दिलं आहे, याचा अर्थ येत्या महिना-दोन महिन्यात निवडणुका जाहीर होऊ शकतात. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हाताता भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे. हे जे त्यांचं स्वप्न आहे ते धनुष्यबाण त्यांना देऊन पूर्ण करायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

उद्या आमचं मशाल चिन्हही घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे.  जितका अन्याच केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन तुम्ही आमच्यावर कराल, त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्राती जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यांना जे धनुष्यबाण मिळालं आहे ते कागदावरचं आहे, पण खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आहे आणि कायमचं माझ्याकडे राहाणार आहे. 

अनेकांना असं वाटलं असेल की शिवसेना संपली, पण शिवसेना लेचीपेची नाहीए, रामायणात जसा रामाचा विजय झाला, सत्याचा विजय नेहमी होत असतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.