कोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलले उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेनेत बरेच फेरबदल करण्यात आले. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. कोरेगाव-भीमा वादावर देखील उद्धव ठाकरे बोलले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 23, 2018, 01:47 PM IST
कोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलले उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेनेत बरेच फेरबदल करण्यात आले. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. कोरेगाव-भीमा वादावर देखील उद्धव ठाकरे बोलले.

'श्रेय कसलं घ्यायचं हे कळत नाही. संभाजी राजेंचे तुकडे करुन टाकण्यात आले. ते कोणी शिवले याच्यावरुन वाद सुरु आहे. ते कोणी शिवले याचं श्रेय घेत असतांना त्या काळी असं झालंच का याचा संताप आला पाहिजे होता. औरंगजेबच्या तंबुचे कळस कापणारे मराठे असतांना सुद्धा माझा संभाजी राजांचे तुकडे होऊच कसे दिले.'

'तुकडे झाले तरी संभाजी राजेंनी इस्लाम धर्म स्विकारला नाही. मराठी मातेची बेईमानी करणार नाही असं देखील राजेंनी म्हटलं असेल. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी मूळ काय केलं हे विसरुन जाऊन जर आपण देहाचे तुकडे कोणी शिवले यावरुन फाटाफूट करणार असू तर काय फायदा. तोडायला वेळ लागत नाही पण एकत्र करायला खूप मोठा कालखंड द्यावा लागेल.'

'यामागे अदृष्य हात असल्याचं म्हटलं जातंय. पण राजकारणाची पोळी भाजण्यासाठी मराठी माणसाला पेटवणार असाल तर शिवसेना या अदृष्य हातांना सोडणार नाही असं देखील उद्धव यांनी म्हटलं आहे. कृपया वाद करु नका. आपल्यातच वाद झाले तर महाराष्ट्राचे आणि मराठीचे तुकडे होतील. महाराष्ट्राला जर तोडण्याचा विचार करतील तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू' असं देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.