Balasaheb Thackeray Memorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्मृतिस्थळाला वंदन, ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा गुरुवारी 17 नोव्हेंबरला 10 स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.   

Updated: Nov 16, 2022, 10:56 PM IST
Balasaheb Thackeray Memorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्मृतिस्थळाला वंदन, ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मृतीस्थलावर (Balasaheb Thackeray Memorial) हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. शिंदे दर्शन घेतल्यानंतर निघून गेले. यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. त्यामुळे आता मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद पेटण्याची शक्यता आहे.  (uddhav thackeray group did purification of balasaheb thackeray memorial after cm eknath shindes visit maharashtra politics)

बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 17 नोव्हेंबरला 10 स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदार अभिवादनासाठी उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक तिथून निघून गेले. त्यानंतर काहीच वेळात तिथे ठाकरे गटाचे शिवसैनिक पोहचले. त्यांनी गोमूत्र शिंपडत त्यांनी स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण केलं.  

दरम्यान ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी 19 ऑगस्ट 2021 रोजी अशाच प्रकारे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तेव्हा मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. तेव्हा राणे यांनी स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केलं होतं. मात्र त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून फुलं वाहून स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं.  

दरम्यान बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मारकाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. शिवाजी पार्क परिसरात महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनतंय. स्मारकाचं 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालंय. याची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिलमधल्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रपणे बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवर करणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय.

संबंधित बातम्या : 

Narayan Rane | नारायण राणेचं स्मृतीस्थळाचं दर्शन, शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण