बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

Updated: Aug 7, 2017, 02:09 PM IST
बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक title=

मुंबई : मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

दरम्यान आज सकाळपासून मुंबईकरांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत आहे. बेस्टच्या ढसाळलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा पगार वेळेवर देणंही बेस्टला शक्य होत नाही आहे. त्यामुळे आता बेस्ट कर्मचा-यांना बीएमसी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासन आणि पालिकेतले सत्ताधारी या दोघांकडेही ठोस तोडगा नाही असा कर्मचारी संघटनांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी संघटनांनी कर्मचा-यांचं मतदान घेऊन संप करायचा की नाही याचा निवडा केला. त्यात कर्मचाऱ्यांनी संपाच्य़ा बाजूनं कौल दिल्यावर प्रशासनानं संप टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्य़ा. काल दिवसभर महापौर विश्वनाथ महाडेश्वरांपासून तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या तीन बैठकही अयशस्वी ठरल्या. त्यामुळे मध्यरात्रीपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाहीये. त्यामुळे एकुणच या संपामुळे रक्षाबंधन सणासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणा-या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.