२ मुलींनी शोधली शहरातील वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया

मुंबईतल्या वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया शोधून काढलीय. मुंबईतल्या दोन मुलींनी.

Jaywant Patil Updated: Apr 2, 2018, 10:25 PM IST
२ मुलींनी शोधली शहरातील वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया शोधून काढलीय. मुंबईतल्या दोन मुलींनी. काय आहे ही निळ्या सिग्नलची आयडिया. सिग्नल हिरवा होईपर्यंत वाहनांचं इंजिन सुरूच ठेवलं जातं. त्यामुळे मुंबईच्या वायूप्रदूषणात आणखीनच भर पडते. त्यावरच उपाय शोधून काढलाय तो मुंबईतल्या मुलुंडच्या दोन चिमुरड्या बहिणींनी. शिवानी खोत आणि ईशा खोत यांनी यावर एक आयडिया शोधून काढली आहे. ती आयडिया आहे लाल, हिरव्या, पिवळ्या सिग्नलबरोबरच निळ्या सिग्नलची.

निळा सिग्नल करेल वायू प्रदुषण कमी

लाल, पिवळा आणि हिरवा या सध्याच्या 3 सिग्नल्समध्ये निळा सिग्नल लावावा आणि निळा सिग्नल सुरू असताना वाहन बंद करणं बंधनकारक करावं, असा उपाय या दोघींनी सुचवलाय. लाल सिग्नल सुरू झाल्यावर पाच सेकंदांनतर निळा सिग्नल सुरू करावा आणि हिरवा सिग्नल सुरू होण्यापूर्वी पाच सेकंदांपूर्वी निळा सिग्नल बंद करावा, त्यामुळे वायू प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल, असं या दोघींचं म्हणणं आहे. 

शिवानी आणि ईशाच्या या प्रकल्पाला सुवर्णपदक

दिल्लीमधल्या एका विज्ञान संशोधन महोत्सवात शिवानी आणि ईशाच्या या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं. शिवानीचे वडील दत्तात्रय खोत हे मुंबई पोलीस खात्यात सहाय्यक आयुक्त आहेत. शिवानीची ही संकल्पना भविष्यात काळाची गरज बनेल, असं तिचे आई वडील म्हणतात. 

तब्बल 24 कोटी रूपयांचं इंधन वाया

एकट्या दिल्लीमध्ये एका दिवसात सिग्नलवर वाहनं सुरू ठेवल्याने तब्बल 24 कोटी रूपयांचं इंधन वाया जातं आणि काही टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो. अशा परिस्थितीत या निळ्या सिग्नलचा उपाय परिणामकारक ठरणार आहे.