त्रिपुरात डाव्यांचा पराभव, भाजपच्या विजयाचे शिल्पकार मराठी सुभेदार

त्रिपुरात डाव्यांचा पराभव करत भाजप बहुमताने विजयी झाला. या भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत मराठी सुभेदार. त्रिपुरा, ज्या राज्यात गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे एकही जागा नव्ह ती, तिथे भाजपची सत्ता आणणं ही किमया करुन दाखवली ती सुनील देवधर या मराठमोळ्या माणसानं. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2018, 11:56 PM IST
त्रिपुरात डाव्यांचा पराभव, भाजपच्या विजयाचे शिल्पकार मराठी सुभेदार title=

मुंबई : त्रिपुरात डाव्यांचा पराभव करत भाजप बहुमताने विजयी झाला. या भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत मराठी सुभेदार. त्रिपुरा, ज्या राज्यात गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे एकही जागा नव्ह ती, तिथे भाजपची सत्ता आणणं ही किमया करुन दाखवली ती सुनील देवधर या मराठमोळ्या माणसानं. 
 
''सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं, त्याला प्रतिसाद देत सुनील देवधरांनी राष्ट्रबांधणीच्या निर्धारानं घर सोडलं.

कोण आहेत सुनील? 

- सुनील देवधर मूळचे रत्नागिरीतील गुहागरचे.
- पुण्यात जन्म आणि मुंबईत  Msc Bed शिक्षण
- संघाचं बालकडू घरातूनच मिळालं
- एक वर्ष विद्यानिधी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी 
- 1991 साली देवधर संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले
- 1991 पासून 8 वर्षं त्यांनी मेघालयात काम केलं. 
- माय होम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली

मोठ्या विश्वासानं त्रिपुरात पाठवण्यात आलं

अमित शाह यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर इस आदमी को जंगल में भेज दो, म्हणून देवधरांना मोठ्या विश्वासानं त्रिपुरात पाठवण्यात आलं. सगळ्यात आधी माणसं आपलीशी करण्यासाठी देवधर स्थानिक भाषा शिकले. त्रिपुरात वन बुथ दहा युथ अशा पद्धतीनं देवधरांनी बांधणी केली.

म्हणून त्रिपुरात कमळ फुललं

त्रिपुरातल्या 3214 बुथसाठी 18 ते 25 वयोगटातल्या तरुण कार्यकर्त्यांची फौज उभी केली. कांग्रेससह, स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते एवढंच काय माकपचे कार्यकर्तेही भाजपत आले. त्यांना दोन वर्षं प्रशिक्षण देण्यात आलं. दररोज 24 कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर जाऊन मोदींनी केलेल्या कामांची माहिती द्यायचे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या 3 वरषांत 52 केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्य भारताचे दौरे केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्रिपुरात कमळ फुललं.

सुनील देवधरांचा सिंहाचा वाटा 

यापुढेही त्रिपुरातल्या जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी त्रिपुरातच राहणार असल्याचं देवधर सांगतात. त्रिपुरात भाजपची सत्ता येईल तेव्हा विप्लव देव मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातायत. संघाच्या एका शिबिरात सुनील देवधरांनी विप्लव देव यांना दंड शिकवला होता.  दंडापासून त्रिपुरातल्या राजदंडापर्यंतच्या या प्रवासात सुनील देवधरांचा सिंहाचा वाटा आहे