Video : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत

Viral Video : मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट याबद्दल कायम बोलं जातं. कारण कुठलीही घटना असो मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. असाच एक देव माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Dec 26, 2022, 02:19 PM IST
Video : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत title=
Trending Video mumbai accident news Mumbaikars helped the injured people True Mumbai Spirit viral on Social media nmp

Trending Video : मुंबई (Mumbai news), मुंबईकर (Mumbaikar) आणि त्यांचं स्पिरिट...जणू हे काही समीकरणच आहे. 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 26 जुलै पावसाचा कहर असो, लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट अगदी कुठलीही घटना असो...हे मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे अनेक धर्माचे, अनेक जातीपातीचे लोक या वेळी एका रंगात न्हावून निघतात. त्यावेळी तो प्रत्येक व्यक्ती हा एक मुंबईकर असतो... 

माणुसकी जिंकली! 

आपण रस्त्याने जाताना कधी कधी असे लोक आपल्या आजूबाजूला पाहतो, ज्यांना मदतीची गरज असते. काही जण माणुसकी जपत त्यांना मदत करतो. मग ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडायचा असतो किंवा अजून कुठलीही मदत...पण काही लोकांना माणुसकीचा विसर पडला आहे असंच वाटतं. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुंबईकरांनी माणुसकी जिंकली आहे. (Trending Video mumbai accident news Mumbaikars helped the injured people True Mumbai Spirit viral on Social media )

देव नाही तर आणखी कोण?

झालं असं की, कल्याण बदलापूर (Kalyan Badlapur news) रस्त्याच्या वळणावर एका रिक्षाला अपघात (accident Video) झाला होता. रिक्षाचालक गंभीर जखमी होता तर त्या रिक्षामधील प्रवाशालाही मार लागला होता. ही घटना बघता क्षणी मुंबईकर त्यांचा मदतीला धावून आला. त्यांनी कारमध्ये या जखमींना घेतलं आणि ते रस्त्याने निघाले. जखमींना तातडीने उपचाराची गरज असल्याने या गाडीच्या पुढे बाईकवर दोन जण रस्ता मोकळा करत होते. अशाप्रकार त्यांनी या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुंबईकरांच्या स्पिरीटपुढे यमराजाचंही धाडस झालं नसावं, असं या व्हिडिओला पाहून वाटतं. जर तुम्हालाही असं कोणी कधी दिसलं तर त्यांना मदत करा. आपली एक छोटीशी मदत एखाद्याला जीवनदान देऊ शकते.  हा व्हिडिओ इन्स्टाग्राम aamchi_mumbai_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.