परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

राजीव कासले | Updated: Aug 28, 2024, 08:25 PM IST
परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक title=

Trending News : भारतात दरवर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. पर्यटक भारतीय संस्कृती, खाद्यपदार्थ आणि इथली निसर्गरम्य ठिकाणांच्या प्रेमात पडतात. पण भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या (Foreign Tourists) पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर (Instagram influencer) आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. @naw.aria या नावाच्या अकाऊंटवरुन या इनफ्ल्यूएन्सरने भारतातील विविध ठिकाणचे फोटो शेअर केले आहेत. 

भारत दौऱ्यावर आलेल्या स्वित्झर्लंडच्या या इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर अनेक ठिकाणी भेट दिली. यादरम्यान तीने जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महललाही (Taj Mahal) भेट दिली. ताज महलचं सौंदर्य पाहून ती याच्या प्रेमातच पडली. भारतीय पेहरावत तीने ताजमहल समोर अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. एका व्हिडिओत तीने बॅकराऊंडला हिंदी गाणंही लावलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ताजमहल समोर काढलेल्या एका फोटोसोबत तीने 'Don't travel to India म्हणजे भारताचौ दौरा करु नका' असं कॅप्शन दिलं होतं. 

असं कॅप्शन का दिलं?
@naw.aria ने असं कॅप्शन का दिलं याबाबत लोकांना आश्चर्य वाटलं, पण पूर्ण स्टोरी वाचल्यानंतर लोकांनी तिचं कौतुक केलंय. वास्तविक तीने आपल्या स्टोरीत लिहिलंय ''आग्रा इथल्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालमध्ये आयुष्यभराचं साहस अनुभवायचे नसेल तर भारताचा दौरा करु नका' आयुष्यात एकदा तरी ताजमहलला भेट आवश्य द्या असं तीने म्हटलं आहे. 

स्वित्झर्लंडच्या इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरच्या पोस्टनंतर भारतीयांनी यावर कौतुकाची पोस्ट केलं आहे. अनेकांनी तिचे आभार मानले आहेत. तर काही जणांनी तिला भारतातील आणखी काही सुंदर जागांना भेट देण्याचं आमंत्रण दिलं आहे. भारताचे सौंदर्य अनुभवल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद, असं काही जणांनी म्हटलं आहे. 

@naw.aria या अकाऊंवर अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत, भारतातील विविध राज्यांना ती भेट देत असून तिथली संस्कृती आणि परंपरा जाणून घेतेय. देशाची राजधानी दिल्ली, ऐतिहासिक राजस्थान या राज्यांना तीने भेट दिली असून आपल्या पोस्टमधून ती भारतीय पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतेय.