VIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा

किरकोळ भांडणातून हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे

Updated: Jul 30, 2021, 07:03 PM IST
VIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा  title=

मुंबई : मुंबईतल्या जोगेश्वरी भागात एक संतापजवक प्रकार समोर आला आहे. अंतर्गत भांडणातून दोन व्यक्ती एका तरूणाला कचरा खाण्यास भाग पाडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओतील तरूण वारंवार विनवणी करतांना दिसतोय. तर दोन जण कचरा खाण्यासाठी त्याला धमकावत आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये काही जण या तरुणाला मारहाण करत कचरपेटीत फेकलेलं अन्न उचलून खाण्यास सांगत आहेत. तो तरुण 'मत भाई, मत' करत विनवण्या करत आहे, पण त्याला जबरदस्तीने कचरापेटीतलं अन्न खायला लावलं. इतकंच नाही तर त्याला कचऱ्यावर झोप 'लेट जा, एक बार लेट जा' असंही सांगण्यात आलं. 

हा प्रकार 21 जुलैचा असल्याचं सांगण्यात येतंय. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केलीय. तर एक आरोपी फरार आहे. वैयक्तीक वादातून अशाप्रकारे एखाद्या तरूणाला कचरा खाण्यास भाग पाडणं हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. असं कृत्य करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.