ब्रिटीशकालीन मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आता पर्यटकांना आतून पाहता येणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हेरीटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
Updated: Jan 28, 2021, 08:23 PM IST
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हेरीटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत १२८ वर्षं जूनी आहे. ब्रिटीशकालीन गॉथिक शैलीचं बांधकाम असलेली ही इमारत पर्यटकांना आता आतून पाहता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पर्यटकांसाठी संपुर्ण वास्तूचा हेरीटेज वॉक कार्यक्रम तयार केला आहे. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
•ही इमारत म्हणजे मुंबई महानगराच्या नागरी सेवेचा व विकासाचा अबोल साक्षीदार होय.
•मुंबई महानगरातील सुमारे दीड कोटी लोकसंख्येला नागरी सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण.
•भारतातील अग्रगण्य शहर (Urbs Prima In Indis) म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई महानगराचे प्रतिनिधीत्व या इमारतीचा २३५ फूट उंचीचा मनोरा करीत आहे.
•स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली.
•फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार.
•दिनांक २५ एप्रिल १८८९ रोजी बांधकामास प्रारंभ. दिनांक ३१ जुलै १८९३ रोजी पूर्णत्वास.
•रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्ण. ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी अपेक्षित कालावधीत काम पूर्ण केले.
•तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या ६६००.६५ चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली.
•या इमारतीमध्ये दिनांक १६ जानेवारी १८९३ रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ.
•ही सर्वांगसुंदर व भव्य अशी इमारत गॉथिक वास्तूशास्त्र पद्धतीने बांधलेली आहे. त्यात पौर्वात्य व पाश्चात्त्य स्थापत्य कलेचा मनोहारी संगम. ठिकठिकाणी त्याचा प्रत्यय.
•मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ प्रमाणे याच इमारतीतून कामकाज सुरु.
•मुख्यालयात सुमारे ६८ फूट लांब, ३२ फूट रुंद, ३८ फूट उंचीचे ऐतिहासिक सभागृह हे आकर्षणाचा भाग. सभागृहात दोन प्रेक्षक दालनांचाही समावेश. तसेच तीन मोठी झुंबरही.
•इमारतीचे मूळ स्वरुप आजही कायम. अंतर्गत रचना बदलताना मूळ स्वरुपाला कोणताही धक्का न लावता प्रयत्नपूर्वक या इमारतीचे बांधकाम व सौंदर्य जपण्यात येत आहे.
•सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिकेत नागरी हक्कांसाठी झगडत मुंबई महानगराच्या विकासाला दिशा देणारे असे सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा दिनांक २३ एप्रिल १९२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थापन.
•इमारत बांधकामाचा खर्च रुपये ११ लाख १९ हजार ९६९ इतका झाला. मूळ अंदाजित खर्च रुपये ११ लाख ८८ हजार ०९२ रुपयांच्या तुलनेत ६८ हजार ११३ रुपये इतका कमी खर्च झाला. बांधकाम पूर्ण करुन शिल्लक रक्कम सरकारजमा करण्यात आली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.