Mumbai Crime: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून बोगस वैद्यकीय डॉक्युमेंट बनवण्याचं रॅकेट सुरु होतं. अखेर मुंबई पोलिसांनी बोगस डॉक्टुमेंट बनवणाऱ्या रॅकेटचा खुलासा केला आहे. पोलिसांनी सिव्हिल रूग्णालयाच्या वॉर्ड बॉयसह चार जणांना अटक केली आहे. या सर्व लोकांनी डोमेन ज्ञानाचा वापर त्यांच्या ग्राहकांना तात्पुरती दुखापत करण्यासाठी केल्याचं समोर आलं. यामुळे मेडिकल सर्टिपिकेट मिळवणारे लोक त्यांच्या शत्रूंविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना फसवू शकतील.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा मुख्य आरोपी वासू ठोंबरे याने विचित्र पद्धत वापरली आहे. हा व्यक्ती प्रथम त्याच्या ग्राहकाचं बोटं तोडण्यापूर्वी त्याला विषाचे इंजेक्शन द्यायचा. यानंतर रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचा आणि डॉक्टरांना बोटाला झालेल्या दुखापतीचा उल्लेख करणारी मेडिकल सर्टिफिकेट तयार करायचा.
पोलिस अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, हा जखमी व्यक्ती पोलिसांकडे जायचा आणि त्याच्या शत्रूंविरुद्ध एफआयआर दाखल करायचा. यावेळी तो पोलिसांकडे जाऊन सांगत असे की, जुन्या शत्रुत्वावरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. ठोंबरे, बाबू निसार सय्यद, समीर इश्तियाक हुसेन आणि अब्दुल हमीद खान अशी तीन आरोपींची नावे आहेत. एका केससाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च येत असे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फैजान अहमद खान यांच्या तुटलेल्या बोटांवर उपचार करताना महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्याने हा वॉर्ड बॉयचा प्रकार उघड झाला. यानंतर फैजानला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी सर्व गोष्ट सांगण्यात आली.
त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या सोसायटीतील रहिवाशांच्या काही वादातून आपल्याला तिघांना अडकवायचं होतं. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आयपीसीच्या कलम 328 आणि 120 बी अन्वये अटक केली असून ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हे करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.