MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. नवनविन मित्र आम्हाला मिळालेत. आता मविआचा विस्तार झालाय, असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत डाव्या आघाडीसह इतर छोटे पक्ष सामील झाले आहेत. डावे पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असल्याचे राऊतांनी सांगितले.
वंचितचे तीन प्रमुख नेते आल्यापासून सोबत होते. त्यांनी आमच्यासोबत जेवण केले त्यांनी. त्यांना योग्य वागणूक दिली नसल्याचा त्यांचा दावा चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2 तारखेला प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.
नितीशकुमार यांची जेडीयू भाजपसोबत गेली असली तरी राज्यातील जेडीयूचे नेते आमदार कपिल पाटील यांनी मात्र मविआच्या बैठकीला हजेरी लावली. तसंच एका जागेची मागणीही केली. त्यांच्यासोबत जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष अतुल देशमुख आणि मुंबई महासचिव सचिन बनसोडे हेही मविआच्या बैठकीसाठी हॉटेल ट्रायडंटमध्ये उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेत मोर्चे बांधणी करतायत...आंबेडकरांनी रिसोड तालुक्यातील बेलखेडा, कवठा, सवड या गावांमध्ये सभा घेतल्या मुस्लिम युवकांशी संवाद साधला...अकोला प्रकाश आंबेडकरांची पारंपारिक जागा आहे...आता महाविकास आघाडीही या जागेसाठी आग्रही असल्याचं समजतंय. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिलीय.. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिलीय. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झालीय..