Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकी

Threats to Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना धमकी देण्यात आली आहे.  

Updated: Oct 14, 2022, 08:11 AM IST
Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकी title=

मुंबई : Threats to Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना धमकी देण्यात आली आहे. आपल्याला धमक्या दिल्याचा दावा सुषमा अंधारे (sushma andhare threat) यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच काळजी घ्या, असे पोलिसांनी सांगितल्याचा त्या म्हणाल्यात. दरम्यान, आम्ही शांत आहोत. पण गप्प बसणार नाहीत, असंही अंधारे यांनी म्हटले आहे.

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात महाप्रबोधन रॅली काढण्यात येणार आहे. याची सुरुवात ठाण्यातून झाली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन रॅली काढण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून नवीन चिन्ह घराघरात पोहोचविण्यात येणार आहे. शिवसेनेची भूमिकाही यातून स्पष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केली. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवत चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून त्यांच्यावर ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.

आपल्याला मिळत असलेल्या धमक्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे. तसेच सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अरविंद सावंत आणि राजन विचारे उपस्थित होते. नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे भाषण प्रचंड गाजल्याने राज्याच्या राजकारणात त्या चर्चेत आल्या होत्या. 

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, मला काही अंतर्गत माहिती समजली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला शिवसेनेला दत्तक देते. काल माझ्या घरी अचानक दोन पोलीस आले आणि संरक्षण देतो म्हणाले, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. दरम्यान, काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्व शाखेतील शिवसैनिक या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाले. हुतात्मा चौक ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळापर्यंत पायी मशाल रॅली काढण्यात आली.