भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, २ ताब्यात

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी

Updated: Jan 20, 2021, 09:11 PM IST
भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, २ ताब्यात title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. धमकी देणाऱ्यांना मुंब्रा इथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आशिष शेलार यांना काल मध्यरात्री धमकीचे तब्बल 10 फोन वेगवेगळ्या नंबरवरून आले. 

या धमकीतील संवाद असे होते, मोठे नेते बनू नका, नाहीतर जीवे मारू. आशिष शेलार यांनी या धमकीनंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गेल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास हातात घेतला आहे. 

दरम्यान हे फोन मुंब्रा इथून असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. वांद्रे पोलिसांनी मुंब्य्रातील या दोनही जणांना मुंब्य्रातून ताब्यात घेतलं. आशिष शेलार यांना ही धमकी कोणत्या कारणावरुन देण्यात आली, यामागे आणखी कोणती व्यक्ती आहे का? हे पोलिसांच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे.