दिवाळीच्या सुट्या यंदा कमी होणार, शिक्षकांमध्ये नाराजी

यंदा विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टा कमी मिळणार

Updated: Oct 12, 2018, 03:33 PM IST
दिवाळीच्या सुट्या यंदा कमी होणार, शिक्षकांमध्ये नाराजी title=

मुंबई : दिवाळीमध्ये दरवर्षी शाळेतील मुलांना 18 दिवसाच्या सुट्या देण्यात येतात. मात्र यावर्षी शाळेतील मुलांना या सुट्टी कमी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, यावर्षी अचानक जास्त पडलेल्या पावसामुळे 3 दिवस सुट्या देण्यात आला होत्या. तर एक सुट्टी मराठा मोर्चा आणि एक सुट्टी भारत बंद दरम्यान देण्यात आली होती. त्यामुळे शाळेतील मुलांना 5 सुट्या जादा मिळाल्या होत्या.

पण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या सुट्या मधील काही सुट्या कमी करण्यात येणार आहे. तसच आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे प्राथमिकसाठी 200 दिवस आणि माध्यमिकसाठी 220 दिवस भरावे लागतात. यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. पण काही शाळांनी पावसाच्या सुट्या तीन दिवसांपेक्षी कमी घेतल्या आहेत. किंवा घेतलेल्या सुट्टया भरून काढल्या आहेत अशा शाळांची दिवाळीची सुट्टी कमी जास्त होऊ शकते.

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. पण दिवाळीच्या सुट्ट्याबाबत अजूनही शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. यंदा 16 ऑक्टोबरपासून शाळेला सुट्टी मिळणार आहे. पण शाळा कधी सुरु होणार याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. पण दिवाळीची सुट्टी कमी होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.