Loksabha Exit Poll : दक्षिण भारतात एनडीए खातं उघडणार, कर्नाटकात भाजप मुसंडी मारणार

Exit Poll Lok Sabha Election 2024:   लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोल वर्तवले जात आहे.

राजीव कासले | Updated: Jun 1, 2024, 07:06 PM IST
Loksabha Exit Poll : दक्षिण भारतात एनडीए खातं उघडणार, कर्नाटकात भाजप मुसंडी मारणार title=

Exit Poll Lok Sabha Election 2024:   लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोल वर्तवले जात आहे. 

एबीपी-सीव्होटर नुसार कर्नाटकात भाजपा मुसंडी मारेल. भाजपप्रणित एनडीएला 23-25 जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला 3-5 जागांवर मानावे लागणार समाधान मानावं लागेल.

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत एनडीएला चार जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 37 जागा मिळतील.

रिपब्लिक-मॅट्रीजच्या पोलनुसार देशात एनडीएला 353 ते 368 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आह. 

आंध्र प्रदेशात एनडीएला 53 टक्के, भारतीय आघाडीला 3 टक्के, वायएसआरसीपीला 42 टक्के आणि इतरांना 2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 

 

Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.