मृत्यूपूर्वी तिने संजुबाबाच्या नावे केली कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 7, 2018, 01:40 PM IST
मृत्यूपूर्वी तिने संजुबाबाच्या नावे केली कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी title=

मुंबई : चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या प्रेमात असतात, हे खरे. पण, हे प्रेम किती असावे? हे कुणालाच सांगता यायचे नाही. अभिनेता संजय दत्तही असाच चाट पडला. एका महिला चाहत्याने संजुबाबाला असे काही पेचात टाकले की, ज्यामुळे त्याच्यासह सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. संजुबाबाच्या एका महिला चाहतीचा नुकताच मृत्यू झाला. पण, धक्कादायक असे की मृत्यूपूर्वी या चाहतीने चक्क कोट्यवधी रूपयांची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली आहे.

संजय दत्तने बॅंक ऑफ बडोदाला लिहीले पत्र

निशी हरिश्चंद्र त्रिपाठी असे या चाहतीचे नाव आहे. अभिनेता संजय दत्तने बॅंक ऑफ बडोदाच्या एका शाखेला पत्र लिहीले आहे. या पत्रात मलबार हिल येथील निवासी निशी हरिश्चंद्र त्रिपाठी हिच्याकढून आपल्या नावावर करण्यात आलेले सर्व बॅंक अकाऊंट आणि लॉकर निशीच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात यावेत.

संजय दत्तही पडला चाट

निशी त्रिपाठीने मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती ( बॅंक अकाऊंट्स, सर्व पैसा आणि बॅंकेतील लॉकरही ) संजय दत्तच्या नावे केली आहे. धक्कादायक असे की, या सर्व प्रकाराची अभिनेता संजय दत्त याला कोणतीच कल्पना नव्हती. जेव्हा २९ जानेवारीला पोलिसांनी जेव्हा संजय दत्तला या प्रकाराबाबत माहिती दिली तेव्हा, संजयला या प्रकाराचा पत्ता लागला. पोलिसांकडून संजयला सांगण्यात आले की, निशी त्रिपाटी यांचे निधन झाले आहे आणि त्यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या नावे केली आहेत.

लॉकर उघडण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू

पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ६२ वर्षीय त्रिपाठी संजय दत्तची जबरदस्त चाहती होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीबाबत जेव्हा खुलासा पुढे आला तेव्हा तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला. तिने सर्व संपत्ती अभिनेता संजय दत्तच्या नावावर केली असेल यावर कुटुंबियांचा विश्वासच बसत नव्हता. दरम्यान, प्रकरण आर्थिक आणि बॅंकेशी संबंधीत असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुले लॉकर उघडण्यात आले नाही.

संजयला काहीही नको

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे. 

निशी त्रिपाठी यांचे १५ जानेवरी २०१८ला प्रदीर्घ अजाराने निधन झाले. ती आपली ८० वर्षी आई, मुले अरूण, आशीष आणि मुलगी मधुसोबत राहात होती. या कुटुंबाकडे १० कोटी रूपयांहून अधिक किमतीचा ३ बीएचकेचा फ्लॅट मलबार हिल येथे आहे.