मुंबई: लोकल चुकून फलाटवर थांबलेल्या प्रवाशांना लुटणारा गजाआड

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी वैतागले आहेत.

Updated: Aug 22, 2018, 12:10 PM IST
मुंबई: लोकल चुकून फलाटवर थांबलेल्या प्रवाशांना लुटणारा गजाआड title=
संग्रहित आणि प्रतिकात्मक प्रतिमा

मुंबई: रात्रीची शेवटची लोकल चुकल्यामुळं अनेक प्रवाशांना रात्रभर रेल्वे स्थानकावर थांबावं लागतं. अशा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील एकाला वांद्रे पोलिसांनी अटक केलीय. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्हीमुळे चोर सापडला

वांद्रे रेल्वे स्थानकावर २९ जुलैच्या मध्यरात्री घडलेली मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणारा चोर या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. १४ ऑगस्टला पोलिसांनी हुजेब हसानुद्दीन नावाच्या या चोरट्याला जेरबंद केलंय.

इतर चोरट्यांचा माग लागणे शक्य

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी वैतागले आहेत. तर, पोलीसही अशा गुन्हेगारांच्या मागावर असतात. त्यामुळे पकडलेल्या चोरट्याकडून इतर चोरट्यांचा माग लागणे शक्य होणार आहे.