ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून

सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

Updated: Jan 29, 2020, 06:43 PM IST
ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून title=
संग्रहित छाया

मुंबई : सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे.  ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारचा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. हा फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ७, कलम १३, कलम १५, कलम ३५, कलम ३८, कलम ४३, कलम ६२, कलम ६२अ मध्ये सुधारणा आणि कलम ३०अ-१ब व कलम १४५-१अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारीत वेळापत्रकात बदल करण्यास मंजूरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे.