शहरात दहशतवादी घुसल्याची वार्ता, वसई हायअलर्टवर !

वसई हायअलर्टवर. वसईत दहशतवादी घुसले. अवघ्या शहराची उडाली झोप.  

Updated: May 31, 2019, 09:43 PM IST
शहरात दहशतवादी घुसल्याची वार्ता, वसई हायअलर्टवर ! title=

वसई : वसई हायअलर्टवर. वसईत दहशतवादी घुसले. पानपट्टीवर दिसले दहशतवादी. अवघ्या शहराची उडाली झोप. शहरात दहशतवादी घुसले आणि सगळं शहर हादरून गेले. दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू झाला आणि समोर आला एक भलताच प्रकार. पोलिसांच्या गाडीने सायरन वाजवत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची धावाधाव सुरु आहे. एक दहशतवादी दिसतोय. सीसीटीव्ही फुटेतमध्ये तसंतरी दिसत आहे. 

वसई पोलीस स्थानकात फोन खणाणला. फोन होता शहरात दहशतवादी शस्त्रास्रांसह घुसल्याचा. शहरात धावपळ सुरू झाली. वसईत घुसलेले संशयित दहशतवादी नरजेत पडले. पंचवटी नाक्यावर सिगरेट घेण्यासाठी थांबले. बँकेच्या गार्डनं पोलिसांना कळवंल. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक दहशतवादी बसमध्ये चढल्याचे दिसले आणि सुरू झाला त्या बसचा पाठलाग.

पानपट्टीवर दहशतवादी येतो तेव्हा...  

पोलिसांनी वसईसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात नाकाबंदी सुरू केली. बसचा पाठलाग करत करत पोलीस वसईच्या सनसिटी परिसरात पोहोचले आणि मग या सगळ्या थराराचा उलगडा झाला. सनसिटी परिसरात एका चित्रपटातलं शूटिंग सुरू होते. त्या चित्रपटात दहशतवाद्यांची भूमिका करणारे दोघे कंटाळा आला म्हणून त्याच वेशात सिगरेट घ्यायला पानपट्टीवर गेले आणि अवघं शहर हादरले. कथित दहशतवाद्यांची सत्यकथा कळताच पोलिसांच्याही जीवात जीव आला. पाऊण तास हायअलर्टवर असलेल्या वसईने रोखलेला श्वास सोडला.