तेलुगू देसम पक्षाचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला

पावसाळी अधिवेशनात टीडीपी आपल्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 15, 2018, 02:24 PM IST
तेलुगू देसम पक्षाचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला title=

मुंबई: भाजपप्रणीत एनडीएतून बाहेर पडलेल्या तेलुगू देसम पक्षानं आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. टीडीपीचं शिष्टमंडळ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर टीडीपीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

पावसाळी अधिवेशनात टीडीपी आपल्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे  पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेससोडून इतर सर्व पक्षांच्या नेत्यांशी टीडीपीनं भेटीभाठी सुरू केल्या आहेत. या भेटींनंतर टीडीपीचं शिष्टमंडळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अहवाल सादर करणार आहेत.