Dilip joshi House: घराघरात लोकप्रिय झालेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील जेठालालची भुमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांना धमकी आल्याची बातमी कळते आहे. त्यांच्या घरी 25 लोकं हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत, असा धमकीचा कॉल नागपूर पोलिस कंट्रोल (Dilip Joshi Threat) रूमला आल्याचे कळते आहे. अभिनेते दिलीप जोशी यांच्या घराबाहेर काही लोकं हे हत्यारं, बंदूक आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत अशी धक्कादायक माहिती एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून नागपूर कंट्रोल रूमला (Nagpur Control Room) दिली आहे असे समजते आहे. ही माहिती नक्की कोणाला दिली याचा शोध सूरू असतानाच या अज्ञात व्यक्तीचे नावं हे कटके असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येते आहे. (Taarak Mehta Fame jethalal aka dilip joshi house surrounded by 25 armed gunman)
या व्यक्तीनं महिनाभर आधी म्हणजेच 1 फेब्रुवारीला आपण कटके बोलत असल्याचे सांगून नागपूर कंट्रोल रूमला (Nagpur Control Room) दिल्याचे सांगितले. शिवाजी पार्कमध्ये दिलीप जोशी (Dilip Joshi House at Shivaji Park) यांच्या घराच्या बाहेर काही लोकं ही 25 लोकं बंदूक आणि बॉम्ब घेऊन उभी आहेत, असं त्यानं त्या कॉलमध्ये सांगितले आहे. या कॉलमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या फोन फॉलमध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmedra) यांचेही घरं बॉम्बनं उडवू अशी माहिती देण्यात आली असून त्यासाठी 25 लोकं शहरात घुसले आहेत, असे त्यानं फोनवर सांगितले.
या फोनमध्ये त्या व्यक्तीनं अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी यांचाही उल्लेख केला आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या माहितीनुसार, Z+ सुरक्षा (Z+ Security) जारी करण्यात आली आहे.
हा व्यक्ती आहे तरी कोण? आणि या व्यक्तीनं नेमका असा कॉल का केला यावरती पोलिस तपास (Police Investigation) घेत आहेत. परंतु याची माहिती मिळताच नागपूरच्या कंट्रोल रूमनं शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला अलर्ट (Shivaji Park Police Alert) केलं असून एफआयआर (FIR) दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे कळते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फोन करणारा हा व्यक्ती दिल्लीच्या सिम कार्ड (SIM Card Company) कंपनीत काम करतो. या व्यक्तीच्या नंबरचा स्पुफ म्हणून वापर करण्यात आला असल्याचे समोर येते आहे.