Sushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा

अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे

Updated: Dec 27, 2022, 10:01 AM IST
Sushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा title=

Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला आता अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे, पण त्याच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंगने (Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्य केली की हत्या करण्यात आली यावरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. आता या प्रकरणी कूपर रुग्णालयातील (Cooper Hospital) कर्माचाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. 

सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा दावा मुंबईतल्या कूपर रुग्णालयातल्या ( Cooper Hospital, Mumbai) शवागृहातील कर्मचारी रुपकुमार शहा ( Roopkumar Shah) यांनी केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम (Mortuary Servant) करत होते. अभिनेता सुशांतचा मृतदेह आला तेव्हा च्या शरीरावर जखमा आणि मुका मार होता असा दावा त्यांनी केलाय. याबद्दल डॉक्टरांना सांगूनही त्यांनी लक्ष दिलं नाही असा दावा त्यांनी केलाय. 

रुपकुमार शाह यांनी काय दावा केला?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रूपकुमार शाह म्हणाले, मी 14 आणि 15 जूनला ड्यूटीवर होतो, त्यावेळी एक व्हीआयपी मृतदेह आला होता, व्हीआयपी मृतदेह असल्याने पोलिसांची आणि  लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. रात्री 11 ते 12 वाजेदरम्यान तो मृतदेह पोस्टमार्टमसाठी आमच्याकडे आला, कपडा उघडल्यानंतर आम्हाला कळलं की तो मृतदेह अभिनेता सुशात सिंग राजपूत आहे. मृतदेह काहीसा वेगळा वाटत होता, माझा 28 वर्षांचा अनुभव आहे, 50 ते 60 मृतदेहांचं पोस्टमार्टम मी केलं आहे, त्यामुळे मी माझ्या वरिष्ठांना भेटलो आणि त्यांना सांगितलं सर हे थोडं वेगळं प्रकरण वाटत आहे. वरिष्ठ मला बोलले आपण नंतर याबाबत बोलू आणि त्यांनी मला टाळलं. 

त्यानंतर मी जेव्हा पुन्हा मृतदेह पाहिला तेव्हा मृतदेहाच्या गळ्यावर गळफास घेतल्यानंतर जो व्रण असतो तो आत्महत्येसारखा वाटत नव्हता. हात पाय पकडून म्हणजे जबरदस्तीने त्याला लटकण्यात आल्याचं वाटत होतं. याशिवाय हात-पाय आणि शरीरावर मारल्याच्या खूणा होत्या. त्या खूणा फ्रॅक्चरसारख्या होत्या असं रुपकुमार शाह यांनी सांगितलं.

हे ही वाचा : ट्रेनिंग नसताना सापाला पकडणं तरुणाला पडलं महाग, अशी चूक तुम्ही करु नका... पाहा Video

सुशात सिंगने घेताल जगाचा निरोप
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या पाच दिवस आधीच सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालयिन हिने मालाज इथल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणाचाही अद्याप तपास सुरुच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोणीच्या जीवनावरील चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप उमटवली होती. त्यानंतर छिछोरे या चित्रपटातील कामाचीही चांगलीच चर्चा झाली. करिअरच्या शिखरावर असताना सुशांत सिंगने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला.